दिंडोरी - राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यावर निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक नाराज आहेत. आपण पदभार घेतल्यापासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकदाही स्वतंत्र बैठक घेतली नाही व समस्यांचे निराकरणही केले नाही. त्यामुळे दि 17 मार्च 2025 रोजी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार / जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच राज्याचे शिक्षण आयुक्त यांना त्यांच्या कार्यालया समोर आंदोलन करनार आहेत. ह्याबद्दल चे निवेदन नुकतेच दिंडोरी तालुका कार्यकारिणी तसेच सदस्यांनी दिंडोरी तहसीलदार यांना दिले आहे.
त्यात विविध मागण्या करण्यात आल्या आहे प्रामुख्याने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अर्धवेळ, विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा ,1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी , राज्यातील अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावी. जाहीर केलेले अनुदान त्वरित देण्यात यावे,मान्यताप्राप्त आय टी शिक्षकांच्या समायोजनाबाबतचा शासनादेश त्वरित निर्गमित करण्यात यावा,शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 10,20,30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी. निवडश्रेणीसाठीची 20 टक्क्यांची अट रद्द करावी,प्रलंबित वाढीव पदांचे समायोजन त्वरित करावे ,विनाअनुदानित सेवेत असलेल्या शिक्षकांची अनुदानितकडे बदली करून त्यांच्या प्रस्तावास शिक्षण उपसंचालकांनी त्वरित मान्यता द्यावी, संचालक कार्यालयात त्रुटी पूर्तता केलेल्या प्रलंबित वाढीव पदाच्या फाईल्स त्वरित मंत्रालयात मागवून त्या पदांना मान्यता देऊन त्यांच्या समयोजनाचे त्वरित आदेश द्यावेत,सद्यस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडी मान्यतेसाठी शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात 21 विद्यार्थी व वरिष्ठ महाविद्यालय संलग्नितमध्ये 31 विद्यार्थी ग्राह्य धरावेत,एम.फिल., एम.एड., पीएच.डी. धारक क म वि शिक्षकांना उच्च शिक्षणातील शिक्षकांप्रमाणे वेतन वाढ लागू करावी,निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, DCPS/NPS योजना लागू केलेल्या शिक्षकांना हिशोब व देय रक्कम देण्यात यावी. वेतन आयोगाचे थकित हप्ते त्वरित द्यावेत, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा कार्यभार सतत तीन वर्षे कमी झाला, शून्य झाला तरच अतिरिक्त घोषित करावे,अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील अंशकालीन घड्याळी तासावरील शिक्षकांना शासकीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे मानधन द्यावे,कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्यांना पदोन्नतीची वेतनवाढ देण्यात यावी.,अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ झाल्यावर त्यांच्या अर्धवेळ सेवेचा कालावधी वेतनवाढ व इतर लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा.
,अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद करावी.,शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत.,शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत., शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करावा.ह्या मागण्या आहेत .
यावेळी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सह कार्याध्यक्ष प्रा. शिवाजी कदम
जिल्हा संघटक प्रा. संतोष उफाडे , खजिनदार प्रा. हेमंत घडवजे , तसेच तालुक्यातील शिक्षक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते