नांदुरी । कळवण तालुक्यातील नांदुरी येथील पाणी उपसा करणार्या तलावातील अनाधिकृत मोटारी बंद करण्यासाठी शासकीय कार्यवाही करत असताना त्यात शासकीय अडथळा आणून मारहाण व शिवीगाळ केल्याची फिर्याद दिल्याने दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत अधिकारी पंडित चिंतामण महाजन (रा. अभोणा, ता कळवण) हे नांदुरी येथील तलावातून अनधिकृत पाणी उपसा करणार्या मोटारी बंद करण्यासाठी कार्यवाही करताना नितीन मोतीराम चव्हाण, पिंट्या पुंडलिक चव्हाण (दोघेही रा. मोहनदरी, ता.कळवण) यांनी यास विरोध दर्शवून महाजन यांना हाणामारी करत शासकीय कामात अडथळा आणल्याच्या तक्रारीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदुरीत सरकारी नोकरावर हल्ला
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0