ओझे । मविप्र संचलित करंजवण येथील जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात सलाम बॉम्बे फाऊंडेशन व मेक माय ट्रीपया संस्थेच्यावतीने बेसिक ऑफ मोबाईल रिपेरिंग कोर्स व ब्युटी अँड वेलनेस या कोर्सच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे उत्साहात वाटप करण्यात आले. सलाम बॉम्बे फाऊंडेशन व मेक पाय ट्रीप या संस्थेच्या वतीने बेसिक ऑफ मोबाईल रिपेरिंग कोर्स ब्युटी अँड वेलनेस या कोर्सचे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. या कोर्ससाठी एकूण 50 विद्यार्थी सहभागी झाले होते. अविनाश ठाकरे, देवरे, ै पूजा, अतुल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शालेय समिती सदस्य चंद्रकांत देशमुख, नाना मोरे, नंदू मोरे, प्राचार्य वाय. यु. बैरागी, पर्यवेक्षक बी. के. उफाडे आदी उपस्थित होते. सलाम बॉम्बे या संस्थेने उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून आर्यन मोरे या विद्यार्थ्यास मोबाईल रिपेरिंग किटची भेट दिली. सूत्रसंचालन एस. एन. पगार यांनी केले.
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0