दिंडोरी । दुष्काळाच्या झळा दिंडोरी तालुक्यात जाणू लागल्या आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मेंढपाळ बांधवांना मेंढ्यांच्या चार्याबरोबरच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून दिंडोरी तालुक्यातील काही गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने मेंढपाळ बांधवांना मेंढ्यांना पाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. शेतकर्यांच्या जनावरांनाही हिरवागार चारा मिळत नसल्याने मिळेल तेथून चारा विकत घेण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.