नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणीत मार्शल संघटित-असंघटित कामगार युनियनच्या वतीने औद्योगिक वसाहतीतील ट्रॅक कॉम्पोनंट्स लि. एफ-८ या कंपनीत युनियनची स्थापना करण्यात आली. या युनियनच्या माध्यमातून कंपनीतील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. युनियनच्या फलकाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात, सचिव विनेश नरवाडे, खजिनदार दिनेश म्हस्के, अध्यक्ष संतोष निकम आदी उपस्थित होते. युनियनच्या स्थापनेमुळे कंपनीतील कामगारांना एक संघटित व्यासपीठ मिळणार असल्याचा विश्वास संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांनी यावेळी सांगितले.