महाराष्ट्र ट्रायबल न्युज

के आर टी वनी महाविद्यालय येथे योग आणि शारीरिक क्षमता कार्यशाळा संपन्न

संपादक l कृष्णा पवार 
वणी - के आर टी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वनी येथे योग आणि शारीरिक क्षमता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर एस एन शिंदे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वाय एम साळुंखे आणि प्रमुख साधन व्यक्ती म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुरेश इंगळे डॉक्टर दिनेश उकर्डे आणि श्री नामदेव पैठणी यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी प्राध्यापक डॉक्टर सुरेश इंगळे यांनी योग आणि वेलनेस या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले योग आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा असून त्याबद्दल आपण स्व अनुभव घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर शारीरिक शिक्षण आणि शारीरिक क्षमता यामध्ये कशी वाढ होईल याविषयी मार्गदर्शन करताना योग आणि शारीरिक क्षमता याबद्दल विद्यार्थ्यांनी आपली जागरूकता वाढवणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला आर हा सकस आणि संतुलित असावा असे त्यांनी यावेळेस प्रतिपादन केले तसेच डॉक्टर दिनेश उकिरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शारीरिक क्षमता ही खूप महत्त्वाची असून शारीरिक क्षमता जर चांगली असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप प्रभावी असे कार्य करता येते शारीरिक क्षमता कशी वाढेल आणि ती टिकून ठेवण्यासाठी आपण योग आणि फिटनेस याचा कसा उपयोग करून आपला जीवन आनंदमय आणि स्वस्त बनवू शकतो असे त्यांनी यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले नामदेव पैठणी यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृतीद्वारे योग प्राणायाम याची प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांना योगाचा आणि प्राणायामाचा अनुभव दिला त्याचबरोबर ध्यान करून घेतले आणि योगा चे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सांगितले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन शिंदे आणि उपप्राचार्य डॉक्टर वाय एम साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी महाविद्यालयातील डॉक्टर प्रवीण कांबळे प्राध्यापक उमेश देशमुख प्राध्यापक सचिन लोखंडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार डॉक्टर रवींद्र चव्हाण यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने