महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वलखेड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वलखेड प्रतिनिधी | दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे परनॉड रिकॉर्ड इंडिया संचलित व वोक्हार्ड फाउंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते 
वलखेड येथील हनुमान मंदिरातील सभा मंडपात परनॉड रिकॉर्ड इंडिया संचलित वोक्हार्ड फाउंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबिरात जनरल तपासणी, स्त्री रोग तपासणी, दंतरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, रक्त तपासणी, मोतीबिंदू तपासणी ह्या तपासण्या करण्यात आल्या तसेच महिला आरोग्य संदर्भात जनजागृती करून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले व मोफत औषधे देण्यात येऊन अनेक सुविधा या शिबिरात देण्यात आल्या 
याप्रसंगी सरपंच विनायक शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष केशव मेधने, ग्रा.पं सदस्य हिरामण पाटील, सामाजिक कार्यकर्ते नारायण राजगुरु,स्रीरोग तज्ञ डॉ. परीमल चव्हाण, डॉ. संजय देशमुख जनरल, डॉ. प्रतीक्षा शर्मा दंतरोग तज्ञ, डॉ. थोरे नेत्ररोग तज्ञ, नेहा जाधव फार्मासिस्ट, कैलास वसावे पॅथॉलॉजिस्ट, पुष्पावती शार्दुल नर्स, योगेश शिंदे, रोशन पवार, रवींद्र शिंदे, विठ्ठल जाधव, यादव चारोस्कर, अशोक शिंदे, कैलास चारोस्कर, सुनिता चारोस्कर, पूजा जाधव व बहुसंख्येने या शिबिरात महिला व पुरुष ग्रामस्थांनी याचा फायदा घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने