maharashtratribalnews

ज्युपिटर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची बसवंत गार्डनला भेट


                                                                                          दिंडोरी । मनोज पाटील 
दिंडोरी येथील श्री ईशान्येश्‍वर विद्यानिकेतन व ज्युपिट इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बसवंत मधमाशी उद्यान व बसवंत गार्डन या दोन्ही प्रकल्पांना भेट दिली. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासासाठी अनुभवात्मक अध्ययनाला महत्त्व देण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे क्षितिज शालेय क्षेत्रभेटीतून विस्तारते. जिज्ञासा निर्माण होते आणि वर्गाबाहेरील दैनंदिनी जीवनात ज्ञानाचे उपयोजन करता येते. अशा अनुभवात्मक अध्ययनासाठी सदर क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. शालेय वेळेत प्रवासाचा आनंद घेत बसवंत गार्डनमध्ये पोहोचल्यानंतर मुलांना प्रथम अल्पोपाहार देण्यात आला. गाइडच्या मार्गदर्शनानुसार येथील ग्रामीण संस्कृती, चित्रप्रदर्शन, बैल संस्कृती, पक्ष्यांचे गाव, शेततळे, पलोत्पादन, औषधी वनस्पतींचा बगिचा, आदर्श गाव सेवरगाव (मिनीएचर व्हिलेज) पाहून तर विद्यार्थी हरकून गेले. मधमाशीचा जीवनक्रम, मधमाशी पालन, मधमाशांसाठी गाव प्रतिकृती याविषयीची माहिती जाणून घेतली. यावेळी मधमाशीसारखे आपण उद्योजक कसे व्हावे याबाबतचा हाँनी बी हा माहितीपट दाखवण्यात आला. गेमझोनमधील विविध खेळ खेळून मुलांनी प्रचंड धमाल केली. टेरेसवरील गालीच्यावर बसून गोपाळकाल्याचा आनंद घेतला. मिनी रेल्वेचा चक्कर आणि रेन डॉन्समुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या क्षेत्रभेटीसाठी प्राचार्य प्रचिती पितळे, आचल तिवारी, श्रुतिका कराटे ,कल्याणी केदार आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने