संपादक l कृष्णा पवार
ठाणगाव l नामदेव पाडवी:- सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव (कोडीपाडा) येथे दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी उलगुलान आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटना शाखा – सुरगाणा यांच्या वतीने तालुकास्तरीय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष उत्तम वाघमारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य अध्यक्ष पांडुरंग पवार, राज्य नेते रतन चौधरी, एस. के. चौधरी, विभागीय अध्यक्ष गोवर्धन खांबाईत, जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोये, जिल्हा सरचिटणीस राजे मारुती कुंदे, कार्याध्यक्ष लक्ष्मण पारधी, पेठ तालुका सरचिटणीस सगणे सर, संजय भोये, दिलीप खंबाईत नाठे सर तसेच NDPT संचालक प्रभाकर चव्हाण, दिलीप भुसारे, जिजा खाडे / कुंदे यांची उपस्थिती होती.
सत्कार समारंभ
NDPT चेअरमन योगेश महाले आणि माजी सभापती मनीषा योगेश महाले या दाम्पत्याचा त्यांच्या राहत्या घरी भव्यदिव्य सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला. याशिवाय, तालुक्यात मुख्याध्यापक पदोन्नती मिळालेल्या शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांचा देखील संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कार्याध्यक्ष जाधव सर यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरगाणा तालुका सरचिटणीस देशमुख सर, जिल्हा उपाध्यक्ष देविदास देशमुख आणि संपूर्ण सुरगाणा तालुका कार्यकारी सदस्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या भव्य मेळाव्याला शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला यश मिळवून दिले. जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस व संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी (नाशिक) यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.