दिंडोरी- मनोज पाटील :- दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे २८ मार्च रोजी जखमी बिबट्या असल्याचे शिंदवड ग्रामस्थांनी वनविभागाला कळवले होते.वनविभागाकडुन तात्काळ येवुन बिबट्या असलेल्या ठिकाणी पाहणी करत असतांना बिबट्याने वन कर्मचारी यांच्या वर प्रतिहल्ला केला होता या हल्ल्यात शांताराम शिरसाठ व आण्णा टेकनर हे दोघे जखमी झाले होते.शिरसाठ यांच्या पाठीवर बिबट्याने झेप घेत चावा घेतला होता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असुन टेमकर यांच्या पायाला बिबट्याने पंजा मारुन दुखापत केली आहे.त्यानंतर पाचारण केलेली रेस्कीव टिम दाखल झाली व बिबट्याला बेशुध्द करत बिबट्या जेरबंद केला व जखमी बिबट्यावर उपचार सुरु केले त्यानंतर बिबट्याला नाशिक येथे वनविभागाकडुन आवश्यक उपचार देण्यात आले परंतु बिबट्याच्या तब्बेतीत कुठलीही सुधारणा दिसुन येत नव्हती अखेर काल बिबट्याचा मृत्यु झाला असल्याचे वनविभाकडुन सांगण्यात आले आहे परंतु बिबट्या पकडतांना झालेला हल्ला यातुन अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.बिबट्यांची वाढती संख्या यावर शासनाकडुन कुठलीही उपायोजना दिसुन येत नाही,बिबट्यांचा वावर शेती पिकांमध्येच दिसुन येतो मानवाचा व बिबट्याचा रोजचा संघर्ष,भटके व पाळीव कुत्रे
पाणी हे शेताजवळच मिळत असल्याने बिबट्याचा मुक्काम शेती पिकातच,वन्यजमिनींवर जंगल नसल्याने बिबट्याला लपण्याठी जागा नाही,वाढती बिबट संख्या परंतु तालुका स्तरावर अतिरिक्त रेस्कीव टिम नाही,रोज लोकांमध्ये बिबट्या बाबतची माहिती देण्यासाठी वनमित्र नाही,ज्यादा कर्मचारी वर्ग नाही याबाबत शासन किती लोकांवर बिबटे हल्ले करण्याचा वाट बघणार आहे बिबट्याच्या हल्ल्यात नुकसानभरपाई देण्यापेक्षा शेतकऱ्यांना वाचवा व वनविभागाला कर्मचारी वाढवा व आधुनिक उपायोजना करुन सक्षम बनवा अशी मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात येत आहे .