वलखेड l वार्ताहर :-दिंडोरी तालुक्यातील श्रीक्षेत्र वलखेड येथे भारतीय आत्मोन्नती, विश्वशांती सद्गुरु सेवा मंडळ आणि समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र वलखेड यांचे विद्यमाने सालाबाद प्रमाणे चालत आलेल्या रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
येथे शनिवार दि. ५ एप्रिल ते शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ या कालावधीत भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सामुदायिक हरिपाठ, काकडा भजन, भारुड, ग्राम प्रदक्षिणा, सामुदायिक दिंडी आदी कार्यक्रम होणार आहे. प्रथम कलश पूजन, मूर्ती पूजन, ध्वज पूजन, टाळ, मृदंग, विना, हार्मोनियम साहित्य पूजन ग्रामस्थ व मान्यवरांच्या हस्ते पूजन संपन्न होईल दररोजचे कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ८ ते ११ वा. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सकाळी ११ ते १२ गाथा भजन, सायंकाळी ५ ते ६ वा. हरिपाठ, रात्री ९ ते ११ वा. हरिकीर्तने होईल.
कार्यक्रमात होणारे हरिकीर्तने शनिवार दि.५ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प. दिगंबर महाराज शार्दुल आळंदी, रविवार दि. ६ रोजी सकाळी १० ते १२ वा. श्रीराम जन्मोत्सवाचे हरिकीर्तन ह.भ.प. गोकुळ महाराज खुर्दळ खतवड यांचे होऊन रात्री ९ ते ११ वा. ह.भ.प. निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव, सोमवार दि. ७ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प. सुखदेव महाराज पाटील शिंदखेडा, मंगळवार दि. ८ रोजी एकादशीला रात्री ९ ते ११ ह.भ.प. श्रीकांत महाराज आरोळे पंढरपूर, बुधवार दि. ९ रोजी रात्री ९ ते ११ वा. ह.भ.प. अविनाश महाराज रुबते लातूर, गुरुवार दि. १० रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प. साहेबराव महाराज गवळी कन्नड (छ. संभाजीनगर), शुक्रवार दि. ११ रोजी ४ ते ६ वा. दिंडी सोहळा होऊन त्यामध्ये सप्तशृंगी भारुड मंडळ (महारु आबा) पायरपाडा ता. सुरगाणा यांचे भारुड होईल व रात्री ९ ते ११ वा. ह.भ.प. नाना महाराज कापडणीस सोयगाव (मालेगाव), शनिवार दि. १२ रोजी हनुमान जयंतीनिमित्त पहाटे महारुद्रभिषेक पूजा होईल सकाळी ६ वा. हनुमान जन्मोत्सव साजरा होऊन सकाळी ९ ते ११ वा. ह.भ.प. निवृत्ती महाराज शिंदे श्रीक्षेत्र वलखेड यांचे काल्याचे किर्तन होऊन ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद होईल या नाम सप्ताहात नामवंत ज्ञानवंत महात्म्यांची हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे वलखेड ग्रामस्थ व भजनी मंडळातर्फे विनंती करण्यात आली आहे.