संपादक l कृष्णा पवार
पेठ - जागतीक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नरहरी झिरवाळ चॅरीटेबल ट्रस्टतर्फे पेठ ग्रामीण आरोग्य केंद्रात मोतीबिंदू , अंधत्व , नेत्रविकार तपासणी साठी आरोग्य शिबीराचे आयोजनास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला . युवा नेते गोकुळ झिरवाळ यांचे संकल्पनेतून मतदार संघातील मतदारांचे आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करणेसाठी विशेषताः नेत्ररोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते . या शिबीरासाठी डॉ. सचिन , डॉ. डॉ. साहेबराव , डॉ. पोदार व डॉ. जगताप यांचेकडून नेत्ररोग संदर्भातील तपासण्या विनामुल्य करण्यात आल्या . या शिबीरास मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी युवा नेते गोकुळ झिरवाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . योगेश मोरे , श्यामलाल गावीत , महेश टोपले , गटविकास अधिकारी जगन सुर्यवंशी , नगराध्यक्ष करण करवंदे , भाजप पदाधिकारी संजय वाघ , नगरसेवक जितेंद्र जाधव सरपंच हिरामण पवार नगरसेविका शितल राहाणे सरिता हाडळ यांच्यासह मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते .