महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त कळवण शहरातील श्रीरामनगर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील श्रीरामनगर परिसरातील साहेब फ्रेंड्स सर्कल आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दि.11एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेंच त्याचदिवशी सायंकाळी 7 वाजता बाळगोपाळासाठी सांस्कृतील कार्यक्रम होणार असून यात त्यांचे कला कौशल्य बघावयास मिळणार आहे. त्यांचप्रमाणे दि. 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या बाळगोपाळाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांना गौरवीण्यात येणार असून सायंकाळी 8 वाजता भव्य बुद्ध व भिम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन होणार असून महामानवाला आदरांजली म्हणून " एक वही व एक पेन अर्पण,, असा उपक्रम राबविला जाणार आहे. तसेंच सायंकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत भव्य जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती साहेब फ्रेंड्स सर्कल आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ( श्रीरामनगर ) कळवण यांनी दिली आहे.