महाराष्ट्र ट्रायबल न्युज

बोरगावात हरिनाम सप्ताह व विविध कार्यक्रम



बोरगाव l प्रतिनिधी
         सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील हनुमान मंदिर लोकसहभागातून उभारलेल्या मंदिरात ८ ते ११ एप्रिलदरम्यान हरिनाम सप्ताह व मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पुरोहित म्हणून राहुल गायधनी व संजय पाठक उपस्थित राहणार आहेत.
        सप्ताहाच्या पहिल्या दिवशी वास्तुशांती, मांडव व मिरवणूक, कलशारोहण, गणेश व जलनिवास आणि अभिषेक विधीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यानंतर दररोज सत्संग, भजन, कीर्तन, प्रवचन आणि हनुमान याग आदी धार्मिक कार्यक्रम होतील.

        यावेळी प्रवचनकार लता बागुल, जिवा बाबा, बळीराम महाराज यांचे प्रवचन होणार तर कीर्तन अनंता नाठे, राजराजेश्वरीदिदी, कौशल्या देशमुख, सहजानंद महाराज, आनंदा भरसट महाराज यांचे कीर्तन होणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यानिमित्त विशेष महाप्रसाद आयोजित केला जाणार आहे. (दि. ११) एप्रिलला हरिनाम सप्ताहाची सांगता सामूहिक हनुमान चालिसा पठण आणि महाआरतीने सांगता होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने