दिंडोरी । दि. 5 प्रतिनिधी
निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे सभासद नोंदणी अभियान दिंडोरी, वणी, कळवण येथून सुरुवात करण्यात आली.
निर्भय महाराष्ट्र पार्टी ही सामान्य जनतेसाठी सर्वच आघाड्यांवर सातत्याने लढण्यासाठी तयार असते. सामान्य जनतेवर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी निर्भय महाराष्ट्र पार्टी ही सातत्याने घेत आहे. यावेळी दिंडोरी शहरातून सभासद नोंदणी सुरू झाली. या सभासद नोंदणींस युवकांपासून तर वृद्धांपर्यंत प्रतिसाद दिला. दिंडोरी येथील ही मोहीम दिंडोरी शहराध्यक्ष संजय सिंघवी, महिला शहराध्यक्ष सुनीता जाधव यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे. याप्रसंगी राज्य कोषाध्यक्ष नितीन रेवगडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रघुनाथ चौधरी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायधनी, सोमा कुर्हाडे, संजय काकड, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित, शेतकरी संघटना प्रमुख सुनील धात्रक, तालुकाध्यक्ष कैलास बेंडकुळे, महिला तालुकाध्यक्ष पुष्पा राहिरे, समाधान मिठे, पवार, रियाज शेख, उत्तम पिंगळे, अलका बोंबले, नंदा खर्हाटे आदी उपस्थित होते. यावेळी अक्षय राऊत यांनी पक्ष प्रवेश देऊन दिंडोरी शहर युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहर उपाध्यक्षपदी रवींद्र पाटील, शहर महिला उपाध्यक्षपदी ज्योती रहेरे यांची निवड करण्यात आली.