महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सागर गायकवाड यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

दिंडोरी - मनोज पाटील 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड यांना माणुसकी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य २०२५ च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने दिला जाणारा समाजभुषण पुरस्कार नुकताच माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर निकाळे यांनी जाहीर केला आहे. त्यांच्या निवडीचे विविध स्तरातून कौतुक होत आहे व अभिनंदनचा वर्षाव होत आहे .
सागर गायकवाड हे दिंडोरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,कर्मवीर दादासाहेब गायकवाड विद्यार्थी वस्तीगृह दिंडोरीचे अध्यक्ष आहे. आंबेदिंडोरी ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे पंतू म्हणून नाशिक जिल्ह्यात परिचित आहेत गेली पंधरा वर्षापासून राजकारणात व समाजकारणात सक्रिय सहभागी असून त्यांच्या कामाची दखल घेऊन सदर पुरस्कार मिळाला आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल निवडीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्करराव भगरे,कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, रिपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे, माजी आमदार धनराज महाले, माजी आमदार रामदास चारोस्कर,मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक प्रवीण जाधव, दिंडोरीच्या नगराध्यक्षा सुनीता लहानगे, उपनगराध्यक्षा माधुरी साळूंखे, नगरसेवक नितीन गांगुर्डे, राजेंद्र गांगुर्डे, अमोल निकम, पत्रकार विलास ढाकणे, मनोज पाटील, खंडेराव बोराडे , प्रदिप गांगुर्डे, बाळासाहेब गायकवाड आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर व दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने