दिंडोरी । मनोज पाटील:-केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांची खासदार भास्कर भगरे यांनी भेट घेत अमृत 2.0 योजनेंतर्गत दिंडोरी मतदारसंघातील मनमाड नांदगाव नगर पालिका, येवला चांदवड पिंपळगाव, ओझर नगर परिषद व दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा, निफाड नगर पंचायतींमधील महत्त्वाच्या विकासकामांबाबत तसेच केंद्रीय नगरविकास योजनाबाबत सविस्तर चर्चा केली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागासोबतच शहरी भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अमृत 2 योजनेतील विविध प्रस्तावित कामांना मंजुरी देत सदर कामे लवकरात लवकर मार्गी लागावीत इतर केंद्रीय योजना अंतर्गत विकासकांना मंजुरी व निधी तरतूद व्हावी अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केली.
खासदार भगरेंनी घेतली केंद्रीय गृहनिर्माण मंत्र्यांची भेट "भेटीत अमृत योजनेंविषयी चर्चा"
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0