केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची खासदार भास्कर भगरे यांनी मुंबई आग्रा तसेच पिंपळगाव सापुतारा राष्ट्रीय महामार्ग वरील विविध समस्या बाबत भेट घेत चर्चा करत समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
आग्रा महामार्गवरील दहावा मैल उड्डाणपूल चे काम सुरु करावे. त्याचप्रमाणे शिरवाडे वणी- चांदवड येथील उड्डाणपूल कामास मंजुरी द्यावी तसेच राहुड घाटात होणारे नेहमीचे अपघात यावर उपाययोजना करणे व चिंचवे ता. देवळा या गावाजवळ भुयारी मार्ग स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी करण्यात आली. पिंपळगाव सापुतारा मार्गांचे काम चार वर्षापासून सुरू असून आज त्या रस्त्याची अवस्था बऱ्याच ठिकाणी रस्त्याला भेगा खड्डे गटारीची काम अपूर्ण असताना पांडाणे येथे टोल चालू केल्यामुळे प्रवासी टोल भरण्यास नकार देत आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे काम ताबडतोब पूर्ण करावे स्थानिक नागरिकांना टोल आकारू नये याबाबत सविस्तर चर्चा झाली. गडकरी यांनी दहावा मैल व चांदवड या ठिकाणी फ्लायओव्हर उड्डाणपूल कसा करता येईल याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच चांदवड पासून धुळ्याकडे जाणारा मार्ग सहा पदरी करताना राहुल घाटातील होणाऱ्या अपघातांवर उपाययोजना करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पांडाणे टोल नाक्यावरील अपूर्ण राहिलेली कामे ताबडतोब पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.