संपादक l कृष्णा पवार
दिंडोरी -परनॉड रिकार्ड इंडिया ,चाईल्ड सर्व्हाइव्हल इंडिया व करंजी आश्रमशाळा यांच्या संयुक्तं विद्यमाने " *जागतिक आरोग्य दिवस* " कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा उद्देश आरोग्याबद्दल जणजागृती निर्माण करण्यासाठी आणि त्याचे प्रतिबंध , निदान आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वप्रथम आरोग्याबाबत सत्र घेण्यात आले. मासिक पाळी आणि स्वछता,संतुलित पोषण आहार , माताच्या आणि नवजात बालकाची आरोग्य स्तिथी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर या कार्यक्रमात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ परिमल चव्हाण, डॉ. स्नेहल मोरे ( प्राथमिक आरोग्य केंद्र ,वरखेडा) डॉ. अनुजा जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परनॉड रिकार्ड इंडियाचे मिलिंद आहेर आणि नियती पटेल यांनी भेट दिली . सदर कार्यक्रमासाठी करंजी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सचिन अमृतकर सर आणि गायत्री पाटील मॅडम व इतर शिक्षक याचे विशेष सहकार्य लाभले. गायनॅक ओपीडी-90 ,एच.बी तपासणी - 90 व एन.सी.डी कॅम्प - 59 इ.मुलींनी तपासणी केली.