महाराष्ट्र ट्रायबल न्युज

तळेगांव दिंडोरीत मराठी नावावर्षानिमित्त चैत्र काव्य उत्सव संपन्न


दिंडोरी l मनोज पाटील 
मराठी नवं वर्ष सुरवात निमित्त तळेगांव दिंडोरी येथील युवकांनी मागील वर्षांपासून गावात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी राजकारण विरहित चैत्र काव्य उत्सव कार्यक्रम निमित्त झी मराठी फेम कवी डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांचा वऱ्हाडी भाषेतील विनोदी, हास्य कार्यक्रम व काव्य संपन्न झाला.यावेळी पुस्तकाची माय म्हणून परिचित असलेल्या 156 पुरस्कार प्राप्त आजीचे पुस्तकाचे हॉटेल च्या संचालिका सौ भिमाताई संपतराव जोंधळे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन बचत गटांच्या महिलांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी गावांतील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती फोटो पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संतोष कथार यांनी केले.प्रास्तविकातून कार्यक्रमाचा उद्देश व प्रमुख पाहुण्याच्या परिचय त्यानी करून दिला.
यावेळी दिंडोरी सांस्कृतिक समितीचे सदस्य, विविध साहित्य क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कवी डॉ मिर्झा बेग यांनी श्रोत्यांना खळखळून हसवत जात, धर्म ,राजकारण, समाज प्रबोधन ,करत मार्गदर्शन केले.
माहेरचा सन्मान सर्व पुरस्कारापेक्षा मोठा- सौ भीमाबाई जोंधळे
जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या पुस्तकाची माय म्हणून परिचित असलेल्या सौ भीमाबाई जोंधळे यांचे माहेर तळेगांव दिंडोरी असल्याने त्याना विविध 156 पुरस्कार प्राप्त झालेले आहे.त्यानी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मला अनेक पुरस्कार मिळाले आहे पण माझ्या माहेरच्या लोकांकडून मिळालेला पुरस्कार हा सर्व पुरस्कारांपेक्षा मोठा आहे.मी इयत्ता 5वी शिकलेली आहे.पण माझ्या परिस्थितीने मला कष्ट करण्याची जाणीव करून दिली.पेपर ची एजन्सी असल्याने मला पेपर वाचण्याची आवड व सवय झाली.व नागरिकांनी पेपर व पुस्तके नियमित वाचली पाहिजे.वाचनातून मनुष्य ज्ञानवंत होतो . मी नागरिकाना माझ्या हॉटलेच्या माध्यमातून जेवण,नास्ता सोबत पुस्तके वाचण्यास देत असते.म्हणून सर्वांनी वाचन करणे खूप गरजेचे असल्याचे प्रतिपादन सौ भिमाताई जोंधळे यांनी केले.
यावेळी कार्यक्रम यशस्वितेसाठी काव्य उत्सव समितीचे गोकुळ आव्हाड, संदीप भिकाजी चौधरी, धनंजय घुगे, अमोल ढाकणे, प्रकाश चकोर, मधुकर चौधरी, राजेंद्र कांगने, संदीप ढाकणे,भाऊसाहेब चौधरी, आकाश ढाकणे, धनंजय ढाकणे, सुनील भोई, , गोपाळ घुगे, दत्तू घुगे, दीपक चकोर, केशव उगले, एकनाथ जाधव,राहुल एकमोडे आदी सह युवक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी राजेंद्र उगले यांनी तर आभार गोकुळ आव्हाड यांनी मानले .

*विद्यार्थ्यांचा सन्मान*
तालुका स्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत प्रथम दत्तात्रय प्रमोद कथार, कनिष्ठ सहाययक लेखाधिकारी पदी निवड झालेला अक्षय राजेंद्र ढाकणे, मुंबई लोहमार्ग पोलीस पदी निवड झालेला सूरज ज्ञानेश्वर ढाकणे, कुस्ती स्पर्धेत विभागात प्रथम कुमारी श्रावणी भालेराव, छत्रपती संभाजीनगर कारागृहात पोलीस नियुक्ती झालेली कुमारी जयश्री अशोक चारोस्कर, मुबंई पोलीस पदी कुमारी हर्षल शरद ढाकणे, ऑलिम्पियाड मध्ये यशस्वी झालेला उज्वल चंद्रकांत ढाके,जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत संस्कृती दत्तात्रय घुगे, राष्ट्रीय नौका विहार स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेला निलेश सुनील ढाकणे आदींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने