दिंडोरी। प्रतिनिधी :-दिंडोरी शहरातील श्रीराम मंदिर, रथ गल्ली येथे आज दि. 9 रोजी श्रीराम यात्रौत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सायंकाळी 4 वाजता भव्य रथ मिरवणूक, यात्रौत्सव होणार आहे. प्रमुख आकर्षण म्हणून स्वर सम्राट बँड सटाणा, पारंपारीक सोंग, सबळ पार्टी, लोकनाट्य तमाशा आदी कार्यक्रम होईल. त्याचप्रमाणे शनिवार दि. 12 रोजी दुपारी 4 वाजता नाशिक - कळवण रोड लगत, सिडफार्म, दिंडोरी येथे भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे. तरी यात्रौत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा पंच समिती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थांनी केले आहे.