महाराष्ट्र ट्रायबल न्युज

भाजपा हरसुल मंडल तालुकाध्यक्ष निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली

देवडोंगरी l शंकर निंबारे 
      दि.6 नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हरसुल येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यालयात निवडणूक प्रमुख भाऊसाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ मार्गदर्शक मंगा बाबा गावित यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर दक्षिण मंडल, हरसुल तालुकाध्यक्ष पदाची निवडी प्रक्रिया संदर्भात  बैठक पार पडली. यावेळी बुथ रचना व सक्रिय सभासदांचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमी लक्षात घेऊन हरसूल मंडल तालुका अध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी श्री अशोक भोये, श्री जयराम भुसारे तसेच श्रीमती सुमित्रा वड या तीन इच्छुक उमेदवारांनी मनोगत व्यक्त करुन हरसुल मंडल तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे संमती दर्शवली. या तीन नावावर बैठकीत चर्चा झाली व सर्वांनुमते निवडणूक प्रमुख यांना नावे देण्यात आली यावेळी मंचावर जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती लताताई राऊत, सरचिटणीस श्रीमती सुनंदाताई टोपले, शहराध्यक्ष हरि पवार, कांतीलाल शेट लोखंडे, लक्ष्मण भांगरे, पवन बोरसे, सरपंच पवन गावित, श्रीमती देवका कुंभार आदी उपस्थित होते.
           निवड प्रक्रिया प्रसंगी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक २०२५ लक्षात घेऊन हरसुल मांडला मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती वर भाजपाचा झेंडा फडकविण्यात यावा. असे जयराम भुसारे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच हरसुल मंडळातील बूथ प्रमुख व प्रमुख कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सुचना व मार्गदर्शन केले. यावेळी श्याम भाऊ गावित, हिरामण गावित, हनुमंत तरवारे,अंबादास भाऊ गांगोडे, रामा बाबा लहारे, भगवान कचरे उपसरपंच हिरामण भाऊ घाटाळ, रघुनाथ भाऊ घाटाळ, वसंत कापसे, सुधाकर पागी, काळूदास निंबारे, कैलास वळवी, अरुण भोये, अर्जुन किरकिरे, योगेश मोकाशी, पुढारी वृत्तपत्राचे वार्ताहर मनोज वाजे, रघुनाथ दळवी, प्रकाश कनोजे, सुरेश झोले, नंदराम भुसारे, राहुल चौधरी, चंदू वाघ, भरत बोरसे, नामदेव भुसारे, जयेश राऊत, मोहन कचरे, हरिदास माळेकर, राजेश चहाळे, हिरामण भोये, केशव गावित, दिलीप जाधव, भारत भोये, मोहन भसरे, छानशाम भवर तसेच हरसुल मंडळातील मोठ्या कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने