महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी येथे शिवाजी महाराज चौकात सिग्नलचे भूमिपूजन

दिंडोरी l  मनोज पाटील 
       दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नलचे भूमिपूजन खासदार भास्कर भगरे, कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या हस्ते करण्यात आले.              नाशिक ते कळवण रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. येथे सिग्नल बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती.
अखेर मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक यांच्या प्रयत्नातून सिग्नलला मंजुरी मिळाली आहे. 
       यावेळी कादवा कारखान्याचे संचालक बाळासाहेब जाधव, चंद्रकांत राजे, शिवाजी जाधव, नरेश देशमुख, कैलास मवाळ, सुनीता लहांगे, माधुरी साळुंखे, शैला उफाडे, श्याम हिरे, रमेश बोरस्ते, अनिल देशमुख, सुनील आव्हाड, सतीश देशमुख, प्रकाश पिंगळ, माधव साळुंखे, नगरसेवक नितीन गांगुर्डे, ॲड. प्रदीप घोरपडे, सुजित मुरकुटे, सचिन देशमुख, दीपक जाधव, राजू ढगे, रामदास पिंगळ, डॉ. योगेश गोसावी, छबू मटाले, पांडुरंग गणोरे, डॉ. संदीप गोसावी, रणजित देशमुख, हेमंत पगारे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने