महाराष्ट्र ट्रायबल न्युज

मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वणी l दि.7 वार्ताहर :-वणी व परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन वणीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट यांनी केले आहे.
       या शिबिराचे आयोजन ना. नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने करण्यात आले आहे. वणी ग्रामीण रुग्णालय येथे पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, वणी व्यापारी बँकेचे अध्यक्ष महेंद्र बोरा, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली गायधनी, डॉ. आहेर, मीना पठाण, विजय बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
        शिबिरात डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळ्यांचा नंबर तपासून मोफत चष्मा वाटप, तसेच इतर नेत्ररोगांचे निदान करून मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या उपक्रमाविषयी माहिती देताना गोकुळ झिरवाळ यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक नेत्रोपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
        शिबिरामध्ये डॉ. फुलसे, डॉ. मंगेश वाघ, डॉ. निकिता तिडके, मानसी महाजन, शरद आहेर आदी वैद्यकीय तज्ञांनी उपस्थित रुग्णांची तपासणी केली. या उपक्रमामुळे वणी परिसरातील अनेक रुग्णांना दृष्टीसंबंधी आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने