पेठ l प्रतिनिधी:- मोफत नेत्ररोग शिबिराचा पेठ व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी आशा सेविका कडून केले.
पेठ ग्रामीण रुग्णालय येथे ना. नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने मोफत डोळ्याची तपासणी , मोतीबिंदू व डोळ्यांच्या शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान पाटील ,श्री.आनंद सपकाळ डॉ काकड. पंकज सर भूषण सर व RBSK टिम व NCD टिम आदींच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात डोळ्यांची तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळ्यांचा नंबर चष्मा व इतर डोळ्यांच्या आजाराचे निदान करून त्यावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे गोकुळ झिरवाळ यांनी सांगितले. नाशिक हुन तपासणीसाठी आलेले डॉ. सचिन, ,डॉ. साहेबराव, , डॉ.फौजदार डॉ. जगताप डॉ. नागेश. सानप यांनी शिबिरात आलेल्या रुग्णांची डोळ्यांची तपासणी केली.