महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ना. नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

दिंडोरी । मनोज पाटील 
अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ हे सातत्याने रुग्णसेवेसाठी तत्पर असून त्यांनी नाशिक, मुंबईमध्ये स्वतंत्र रुग्णसेवकांची नियुक्ती करून गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देत आहे. त्यांचेच पावलावर पाऊल ठेवत चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून गोकुळ झिरवाळ हे शिबिराचे आयोजन करत रुग्णांपर्यंत सेवा पोहचवत असून गरजू रुग्णांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जेष्ठ नेते विश्वासराव देशमुख यांनी केले.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत युवानेते गोकुळ झिरवाळ यांचे संकल्पनेतून दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात ना. नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत डोळ्यांची तपासणी मोतीबिंदू व इतर शस्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशमुख बोलत होते. या शिबिरास रुग्णांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत 775 रुग्णांनी लाभ घेतला. सकाळी रुग्णांच्या हस्ते फीत कापून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कादवा कारखान्याचे संचालक बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, प्रकाश शिंदे, भाजप नेते चंद्रकांत राजे, कैलास मवाळ, शिवाजी पिंगळ, उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, युवा नेते गोकुळ झिरवळ, प्रीतम देशमुख, कैलास देशमुख, राजेंद्र उफाडे, हेमंत पगारे, माधुरी साळुंखे, शैला उफाडे, नितीन गांगुर्डे, सुजित मुरकुटे, दीपक जाधव, कृष्णा मातेरे, विनोद देशमुख, विष्णुपंत पाटील, प्रशांत पाटील, प्रतीक जाधव, रमेश बोरस्ते, मनोज ढिकले, नीलेश पेलमहाले, संदिप गोतरणे, विक्रम मवाळ, अनिकेत बोरस्ते, राहुल कावळे नितीन भालेराव, दीपक धुमणे, बबन जाधव, सत्यजित राजे, बापू तासकर, परीक्षित देशमुख, अभिषेक देशमुख, सलीम मिर्झा, डॉ. राहुल जाधव, श्रीराम जाधव, सिताराम जाधव आदी उपस्थित होते. जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत आवारी, डॉ. सृष्टी घुगे, डॉ. हेमंत घांगले, डॉ. समीर काळे, डॉ. ओम कदम, डॉ. पुणवत्कर, डॉ. प्रमोद गजबे आदी वैद्यकीय पथकाने तपासणी केली. *777 रुग्णांची तपासणी*
 शिबिरात एकूण 775 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात 461 रुग्णांना उपचार सुचविण्यात आले. त्यात 318 मोतीबिंदू, 4 तिरळेपणा 2 आर्टिफिशियल डोळ्यांचा तर 137 रुग्णांना चष्मा सुचविण्यात आला. नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे रुग्णांचे ऑपरेशन व चष्मे वाटप करण्यात येणार आहे. यापुढे हि विविध आजारांचे तपासणी उपचार शिबीरे आयोजित करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने