कळवण शहरातील श्रीरामनगर परिसरात साहेब फ्रेंड्स सर्कल यांच्यावतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2569 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वसमावेशक नागरिकांकडून परिसरातून कॅॅंडल रॅली काढण्यात आली. त्यानंतर बौद्धचार्य योगेश साळवे व महेश साळवे यांनी पंचशील, त्रिसरण तसेंच बौध्द पूजापाठ केले. तत्पूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात येऊन खिरदान व अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी इंजिनियर संजीव बैसाणे, पर्यवेक्षिका सुनीता लोखंडे,सचिन जगताप, संदीप जगताप, अमर पगारे, समाधान इंगळे, सचिन भास्कर, कैलास केदारे, भूषण पगारे, बाळू सोनवणे, कैलास बच्छाव, नितीन बस्ते, गौतम केदारे, आदित्य सोनवणे, संतोष भास्कर, निलेश केदारे,आदीसह उपासक उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते.
तथागत गौतम बुद्ध यांची 2569 वी जयंती उत्साहात साजरी.
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0