महाराष्ट्र ट्रायबल न्युज

राजे धैर्यशीलराव पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा सुरगाणा दहावी निकाल शंभर टक्के २०२४-२५ : वृषाली ठाकरे प्रथम

संपादक l कृष्णा पवार 
बाऱ्हे l नामदेव पाडवी:- माध्यमिक आश्रम शाळा, सुरगाणा येथील इयत्ता दहावीचा निकाल सन २०२४-२५ या वर्षी शंभर टक्के लागला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले असून, वृषाली ठाकरे हिने ८७. ६०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आदर्श माळी याने ८५.६०% गुणांसह द्वितीय क्रमांक, तर हिना शेख हिने ८५.२०% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
       शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक श्री.ललित शिंदे सर, प्राथमिक मुख्याध्यापक श्री.सदू बोरसे सर, तसेच सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकवृंद, भाऊसाहेब आणि इतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने