महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सुरगाण्यात यावर्षी 26 हजार मे. टन खतांची मागणी

बोरगांव l प्रतिनिधी 
सुरगाणा तालुक्यात आगामी कृषी हंगामात कृषी विभागातर्फे नियोजन करण्यात आले असून 26 हजार मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आलेली असून ३० हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहणे यांनी दिली.
तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी १८ हजार हेक्टरवर भात, साडेसहा हजार हेक्टरवर नागली, १३०० हेक्टरवर उडीद, ७७० हेक्टरवर तूर, ११० हेक्टरवर सोयाबिन पिकांची लागवड होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याबाबत करता येणार तक्रार

बोगस रासायनिक खतांची विक्री सुरु असल्यास अधिकारी वर्गास त्वरीत माहिती द्यावी, जादा दराने विक्री, कृषी केंद्रात भाव फलक व परवाना सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे, फिरत्या वाहनातून खतांची विक्री, खरेदीची पक्की पावती न देणे अशा विविध प्रकारच्या तक्रारी पथकाकडे कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. 
--
नत्र खतांचा वापराने अळीचा प्रादुर्भाव

नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकांची कायीक वाढ होऊन अळीचा प्रादुर्भाव वाढतो. जास्त नत्र खतांचा वापर न करता जमिनीचे परीक्षण करूनच खतांची मात्रा द्यावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 
-
खरेदी पावती जपून ठेवावी
रासायनिक खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांनी पक्की बिले घ्यावी. तक्रारीसाठी भरारी पथकांशी संपर्क साधावा. काही अडचण आली तर 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर किंवा जिल्हा स्तरावर ७८२१०३२४०८ या व्हाट्सअप क्रमांकावर तक्रार करावी.
- प्रशांत रहाणे, तालुका कृषी अधिकारी, सुरगाणा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने