देवडोंगरी प्रतिनिधी l शंकर निंबारे :-दि.६ माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा आयोजित फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे ६१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. कला शाखेतील सर्व विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. आश्रम शाळेचा शंभर टक्के निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे.
ठाणापाडा आश्रम शाळेतुन कु. प्रियंका कृष्णा देशमुख या विद्यार्थ्यीनीने (७९.३३टक्के) प्राप्त करून प्रथम मिळविला, तर कु. कावेरी नामदेव भुसारे (७८.८३टक्के) प्राप्त करून द्वितीय मिळविला आणि कु. हेमलता शांताराम महाले (७८.७८टक्के) प्राप्त करून तृतीय स्थानी राहिली आहे. एकंदरीत शाळेच्या निकालावर वर्चस्व प्रस्थापित करुन विद्यार्थ्यीनी (मुली) चमकल्या. त्यांच्या या यशाबद्दल मा.अर्पित चौहान साहेब (भा.प्र.से.) सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक, श्री. नामदेव भांगरे साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी) शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र शेंडे, श्री.अशोक चौरे (माजी मुख्यध्यापक), शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम.वनिता भगवान भोये, उपाध्यक्ष श्री.संतोष शिवराम बोचल, अधीक्षक श्री. विष्णुकांत हिंगडे, अधीक्षिका श्रीम.जया बिऱ्हाडे, वर्गशिक्षक श्री.राजेंद्र पाईकराव, श्री.सुदाम धात्रक, श्री.नवल अहिरे, श्री.संजय पाटील, श्री.ध्रुव खैरनार, श्रीम.अरुणा फाले व इतर सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.