बा-हे l नामदेव पाडवी:- संततधार पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील केळावण गावाशेजारील भिवतास धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची वाढती गर्दी होत आहे.
शिव नदीस आलेल्या पुराच्या पाण्याने गेल्या आठवड्यापासून भिवतास धबधबा प्रवाहित झाला आहे. सध्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या हा धबधबा पूर्ण क्षमतेने रोरावत खाली कोसळत आहे. धडकी भरवणारा सदर हजार फूट उंचीवरून खाली कोसळणारा ५०० फूट रुंदीचा प्रचंड जलप्रवाह पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक भिवतास फॉल्सकडे धाव घेत आहेत. त्यामुळे भिवतास धबधबा येथे पहिल्या सुरवातीलाच हजारोंच्या संख्येने पर्यटकांची गर्दी होताना पहावयास मिळत आहे.