maharashtratribalnews

अनेक ठिकाणी पत्रे, कौले, विद्युत तारा, खांब, झाडे कोसळले ; अनेक गावात वीज पुरवठा खंडीत दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ तालुक्यात अवकाळी पाऊस

दिंडोरी । मनोज पाटील 
दिंडोरी, सुरगाणा, पेठ तालुक्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास हजेरी लावल्याने शेतकर्‍यांची तारांबळ उडाली होती. गेल्या महिनाभरापासून उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. 
काल सकाळपासूनच प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता. दुपारी वातावरणात बदल होवून अचानक वादळीवार्‍यासह, विजेच्या कडकडाट अवकाळी पावसाने हजेरी लावली. साधारण 15 मिनिटे हजेरी लावल्याने अनेकांची धावपळ उडाली. शेतकर्‍यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. त्याचप्रमाणे काही गहू काढणीचे बाकी आहे. ते वादळी वार्‍याने आडवे पडले आहेत. तसेच खळ्यावर काढून ठेवलेला गहूही भिजला आहे. त्याचप्रमाणे सुरगाणा तालुक्यात आंबा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
 सुरगाणा तालुक्यातील खिर्डी येथे शिवराम झुला मुरे यांचे घरांचे कौले वादळी वार्‍यामुळे उडून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात झाले आहे. काही ठिकाणी विजेच्या कडाकाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर विद्युत खांब, विद्युत तारा, झाडे, कांदा चाळ, आंबा यासह शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले होते. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी शेतात ठेवलेल्या कांदा पीक व इतर पिके झाकण्यासाठी शेतकरी राजाची धावपळ उडाली. विजेच्या कडकडाटासह वादळी वार्‍यासह पावसाने वीज प्रवाह खंडीत झाला होता. त्यामुळे दिंडोरी शहरासह काही गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. दिंडोरी शहरासह निळवंडी, पाडे, हातनोरे, वनारवाडी, मोहाडी, पालखेड बंधारा, आंबेदिंडोरी, अक्राळे, वनारवाडी, मडकीजांब, जांबुटके, निगडोळ, उमराळे, वलखेड, कोर्‍हाटे, लखमापूर, म्हेळूस्के, जोपूळ, मातेरेवाडी, वरखेडा, खेडगाव, सोनजांब, बोपेगाव, खडकसुकेणे, शिवनई, ओझे, करंजवण, तळेगाव दिंडोरी, इंदोरे, कोचरगाव, अहिवंतवाडी, ननाशी, देवसाने, उमराळे बु. आदी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. विजांचा कडकडाट व जोरदार वार्‍यामुळे शहरासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा ठप्प झाला होता. अनेक भागात वीज तारा तुटल्याने अनेक गावे रात्रभर अंधारातच होती. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने