महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ठाणापाडा परिसरात अवकाळी पावसाचा मोठा झटका. घरांच्या भिंती, छपरांसह जिवनावश्यक वस्तुंची मोठी नुकसान

देवडोंगरी l शंकर निंबारे  
दि.२४ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल - ठाणापाडा परिसरातील चिंचओहोळ, मुलवड, बेरवळ, ओझरखेड, खडकओहोळ, देवडोंगरी, देवडोंगरा, कास सह बाफणविहीर या ग्रामपंचायतीच्या परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांच्या भिंतीसह छपरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसात चार पाच शेतकऱ्यांची घरे पुर्णपणे जमीन दोस्त झाली असून घरातील सर्व साहित्य धन्य धान्याचा तसेच जिवनावश्यक वस्तुंना मोठा फटका बसला आहे. यांसह काथवडपाडा येथील मेन विद्युत वाहिनीचे खांब कोलमडल्याने काथवडपाडासह, खडकओहोळ, विराचापाडा, कडेगहान, तुंगारपाडा, ओझरखेडसह अनेक गावांची विद्युत वाहिनी खंडीत झाली असून अंधारात ग्रामस्थांना चाचपडत राहावे लागले. या दुर्घटनेची माहिती मिळताच भाजपा हरसुल मंडलाध्याक्ष जयराम भुसारे यांनी घटनास्थळी भेट ददेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तहसीलदार यांना नुकसानीची माहिती देत तातडीने पंचनामे करून नुकसानीची मदत मिळावी अशी मागणी केली.
    दिनांक २३ रोजी दुपारी तीन साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाची सुरुवात झाली. या चक्रीवादळासह झालेल्या पावसामुळे ग्रामपंचायत चिंचओहोळ पैकी काकडपाणा येथे अनेक घरांवरील पत्रे, कौलासह घरांच्या भिंतींची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. यात पंडीत बरफ याच्या पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून बांधकाम पुर्ण झालेल्या घरकुलाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. तसेच ग्रामपंचायत मुलवड पैकी गोणापाडा येथील अनेक घरांसह महेश रावजी खरपडे यांच्या घरांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली आहे. तसेच धायटीपाडा येथील काळु जांजर यांच्या घरांची नुकसान झाली आहे. यांसह काथवडपाडा येथील विद्युत वाहिनीचे खांब कोलमडल्याने काथवडपाडा खडक ओहोळ, विराचापाडा, कडेगहान,तुंगारपाडा, ओझरखेडसह परिसरात विद्युत वाहिनी खंडीत झाल्यामुळे रात्र भर अंधारात ग्रामस्थांना चाचपडत राहावे लागले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने