पेठ l प्रतिनिधी :-पेठ तालुक्यातील वांगणी येथे सोमनाथ शंकर धनवले वय २५ या युवकाने आपले राहते घरातील आठयास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली . सदर प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली असून हवा . एन .टी . गायकवाड व हवा . टोपले अधिक तपास करीत आहेत . तर दुसऱ्या घटनेत कोपूर्ली खुर्द येथील जिवन तानाजी तलवारे वय ३० हा युवक पेठ शहरातील रस्त्यालगतच्या दुकानाजवळ सकाळी ७ः३० वाजे दरम्यान आढळून आला . त्याच अवस्थेत पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषीत केले . त्याचेही शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येऊन पेठ पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली . हवा . ए.एम. जाधव व हवा . टोपले अधिक तपास करीत आहेत . मात्र मृतावस्थेत आढळून आलेला जिवन तलवारे याचेवर किशोर गोविंद क्षिरसागर यांचे घरी पाहुणे गेला असता . तेथून ५ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज [ सोन्याचे दागिने व रोख रक्कम ] दि .१७ मे रोजी चोरी केल्याचा गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल झालेला असल्याने व सदरचा मृतदेह पेठ शहरात बेवारस स्थितीत आढळून आल्याने या प्रकाराबाबत साशंकता निर्माण झाली आहे .
पेठ तालुक्यात २ युवकांच्या आत्महत्या
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0