महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पिंपरखेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मुर्त्यू

दिंडोरी l प्रतिनिधी:- दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथे आज दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी पहाटे 4 ते 6वाजेच्या दरम्यान पिंपरखेड फाटा येथे लखमापूर भनवड रस्त्यावर एक मादी जातीचा 10 वर्षाचा बिबट अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी होऊन मृत अवस्थेत मिळून आला आहे. त्या मूर्त बिबटयाला वनविभागाच्या अधीकारी वर्गाने तात्काळ शासकीय वाहनाने ताब्यात घेऊन वणी येथे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडून विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नियमाप्रमाणे पूर्ण अवयवांसह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले. सदरची कार्यवाही सहायक वनसंरक्षक संतोष सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल पंकज परदेशी, वनरक्षक श्रावण कामडी तसेच वनमजूर जयराम शिरसाठ भोये यांचे मदतीने पूर्ण करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने