दिंडोरी l प्रतिनिधी:- क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक साहेब यांच्या स्मृती प्रित्यर्थ नाशिक येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय वसंत क्रीडा स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर नळवाडपाडा (ता. दिंडोरी) विद्यालयातील मुला-मुलींनी खो-खो स्पर्धेत चमकदार कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला. मुलांच्या तसेच मुलींच्या दोन्ही संघांनी विजयाची हाक देत प्रभावी खेळ सादर केला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दाखवलेले उत्कृष्ट नैपुण्य आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेले यश याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. कोंडाजी मामा आव्हाड, उपाध्यक्ष मा. उदयजी घुगे, सरचिटणीस मा. श्री हेमंतआप्पा धात्रक, सहचिटणीस मा. श्री दिगंबरजी गिते व पदाधिकारी यांनी खेळाडूंचे कौतुक करून त्यांना ट्रॉफी प्रदान केली.
या प्रसंगी संचालक मा. श्री. संपतराव वाघ, पालक संचालक मा. श्री. शरदजी बोडके, मा. श्री. सुभाष भाऊ आव्हाड, सेवक संचालक श्री. विवेकजी गामणे, संस्थेचे शिक्षणाधिकारी मा. श्री. ई. के. भाबड सर, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. जयंत भाबड सर, व्ही. के. अलगट सर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पवार सर, क्रीडा शिक्षक श्री. महाले सर, श्री. जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते.
खेळाडूंना श्री. महाले सर, श्री. जाधव सर, श्री. भोये सर व श्रीमती आव्हाड मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
शालेय समिती अध्यक्ष श्री. अंबादासभाऊ ढाकणे, सरपंच श्री. हिरामण गावीत साहेब, मा. संतोषभाऊ वाघ, उपसरपंच श्री. वाघेरे सर, पालक वर्ग आणि ग्रामस्थांनी सर्व विजेत्या खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांचे मनोबल वाढवले.