शुभम नेत्रसेवा ट्रस्ट व तापीबा नेत्र चिकित्सालय सीतापूर (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १) जून रोजी उंबरठाण येथील एकलव्य प्राथमिक व माध्यमिक शाळेत सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
रक्षाबेन पटेल, जगदीश भाई पटेल यांच्या परिवारातर्फे जन सेवेसाठी उंबरठाण येथील एकलव्य प्राथमिक व माध्यमिक शाळेत हे नेत्रचिकित्सा शिबिर होणार आहे. यात डोळ्यांना भुरकट दिसणे, वेदना होणे, डोळे चिकट होणे, लाल होणे यासारख्या समस्यांचे निदान केले जाईल. रुग्णांना मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यावर मास येणे, बुबळावर पांढरा ठिपका अशा आजारावर शस्त्रक्रियेसाठी तापीबा नेत्रसेवा रुग्णालय सीतापूर (गुजरात) येथे दाखल केले जाईल. आयोजकांतर्फे सुरगाणा तालुक्यातील तसेच उंबरठाण परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून आपली नेत्र तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.