दिंडोरी । मनोज पाटील:- गेल्या पाच ते सहा दिवसांपासूनअवकाळी पावसाने कांद्यासह शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रिपाइंचे युवक जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड यांनी केली आहे. पाच ते सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. घराांसह गोदामावरील पत्रे उडाले. कांदा, भोपळा, दोडका, कारले, मिरची, गिलके आदी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेडनेट, मचिंग पेपर हे हवेने उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. अगोदरच शेतीमालाला दर नाही. शेतकर्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रिपाइं युवक जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड यांनी केली आहे.
नुकसान भरपाई द्या : गायकवाड
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0