महाराष्ट्र ट्रायबल न्युज

रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी तर्फे आमदा (बा) येथे सौरऊर्जा संचलित पाणी वापर योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न.

सुरगाणा l कृष्णा पवार 
सुरगाणा तालुक्यातील भवाडा ग्रामपंचायत अंतर्गत आमदा बाऱ्हे गावासाठी पाणी टंचाई मुक्त व्हावी म्हणून रोटरी क्लब नाशिक गोदावरी, जलपरिषद अभियान, व अक्रोन प्लास्ट गोदा जल जिवन अभियान अंतर्गत सौर ऊर्जा संचालित पाणी वापर योजना देऊ केली. ह्या योजनेचा लोकार्पण सोहळ्या निमित्त रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी तर्फे उदघाटक अध्यक्ष प्रांतपाल राजिंदर सिंह खुराणा यांचे हस्ते उदघाटन झाले. प्रमुख अतिथी रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी अध्यक्षा डॉ.मीनल पलोड उपस्थित होत्या. या योजनेसाठी अध्यक्षा डॉ.मीनल पलोड यांनी प्रयत्न करुन आमदा बाऱ्हे गावासाठी ही योजना यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले. 
        आमदा बाऱ्हे गावाने आदर्श स्वयं सहायता बचत गट व ग्रामस्थ यांचे श्रमदान करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांची निवड करुन प्रतिमा पूजन करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानिमित्त आलेल्या प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुणे यांचे आदिवासी पारंपरिक वाद्य वाजून गावातील महिलांनी वाजत - गाजत स्वागत केले. गावातील महिलांनी गावात नैसर्गिक वृक्ष सादडा वृक्ष बीज यांचे तोरण दुतरफा बांधून, कमानी बांधून सुदंर असे गाव सजविण्यात आले होते. प्रमुख उदघाटक प्रांत पाल राजिंदर सिंह खुराणा, प्रमुख अतिथी विनोद चोप्रा संचालक अक्रोन प्लास्ट, डॉ. के. एस. राजन माजी प्रांतपाल, रोटे आशा वेणुगोपाल, डॉ. मीनल पलोड रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी अध्यक्षा, प्रमुख पाहुणे रोटे अवतार सिंग पानफेट एन क्लेब चेअर, रोटे मोहन भावे एन क्लेब सचिव, रोटे ममता कुलकर्णी असिस्टंट प्रांतपाल, डॉ. मेघना नाठे सचिव रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी, डॉ. प्रणिता गुजराथी सचिव रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी,असिस्टंट गव्हर्नर ओमकार महाले,आर्किटेक सोनाली नेरकर, रोटे मधुकर फटांगरे, रोटे राकेश सिंगल, रोटे वासुदेव लालवाणी, विशेष सहकार्य प्रो. प्रवीण चौधरी विजेटी आय, देविदास कामडी जलपरिषद, दिपाली चांडक अध्यक्षा स्वयंशक्ती फाऊंडेशन, विशेष आभार अक्रोन प्लास्ट स्वाती शहा, सुमेरू एज्युकेशन सोसायटी इत्यादी लाभले, लोकार्पण सोहळ्यात ग्रामपंचायत सरपंच कुसुम जाधव, हरीराम जाधव, वनविभाग अधिकारी नवनाथ गांगुर्डे, वनरक्षक लक्ष्मण घटका, लक्ष्मण गायकवाड, गावित तसेच जलपरिषद मित्र गीतेश्वर खोटरे, दुर्वादास गायकवाड, नामदेव पाडवी,नेताजी गावित, योगेश जाधव, केशव पालवी, नितीन भोये, प्रकाश गांगोडे, सदस्य अनिल महाले, बचत गट अध्यक्ष हिराजी महाले, शाळेचे शिक्षक जनार्दन महाले, यशवंत महाले, यशवंत महाले, पांडुरंग महाले, सुभाष महाले, विलास महाले, चेतन महाले, प्रवीण महाले, जलपरिषद मित्र परिवार, समस्त आमदा बाऱ्हे ग्रामस्थ उपस्थित होते.सेवानिवृत्त सैनिक जनार्दन महाले यांचा सत्कार करुन प्रास्ताविक देविदास कामडी यांनी मांडले व आभार दुर्वादास गायकवाड यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने