म्हेळूस्के l वैभव पगार :- राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेमध्ये जनता इंग्लिश स्कूल दिंडोरीच्या तंत्रस्नेही आणि उपक्रमशील शिक्षिका श्रीमती साधना पेलमहाले यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. इगतपुरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री निलेश पाटील सर यांनी हा पुरस्कार प्रदान केला. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक व संशोधन व परीक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. बक्षिसाची रक्कम कार्यक्रमादरम्यान प्रत्येक पुरस्कारथी च्या बँक खात्यावर जमा झाली तसेच ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन आदरणीय निलेश पाटील सर यांनी सर्वांना सन्मानित केले प्रसंगी सर्व अधिकारी व शिक्षक उपस्थित होते. मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव, विद्यालयाचे प्राचार्य श्री शरद शेजवळ, उप मुख्याध्यापक उत्तम भरसट, पर्यवेक्षक रावसाहेब उशीर, यशवंत दाणी, पुरुषोत्तम पगारे सर, ज्येष्ठ शिक्षक संतोष कथार सर व वीरकर मॅडम व सर्व शिक्षकांनी
त्यांचे विशेष कौतुक केले.