दिंडोरी । मनोज पाटील:- नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर शनिवार दि. 17 रोजी सकाळी 9 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिंडोरी येथील शिवाजीनगर भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे. तरी या रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिंडोरी मंडल अध्यक्ष शाम मुरकूटे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा उज्वला उगले, दिंडोरी भाजप शहराध्यक्ष नितीन गांगुर्डे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आव्हान करण्यात आले आहे.
दिंडोरीत उद्या रक्तदान शिबिर
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0