पेठ l प्रतिनिधी:-पेठ - नाशिक ते गुजरात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर करंजाळी ते पेठ दरम्यान देवगाव फाटा नजिक पुलाजवळ वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अवजड वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने या अपघातात जखमी झालेल्या चालकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की , दि. 30 रोजी नाशिकहून गुजरातकडे जाणारा ट्रक क्रमांक TN-52-L-1085 हा देवगाव फाटानजिक उतरावर चालकाचा ताबा सुटल्याने पुलाच्या पुढील वळणावर पलटी झाला. यामध्ये चालक कलईसेलवन शिवलिंगम रा. सेलम तामीळनाडू हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर अवस्थेत आहे. या अपघातात वाहनाचेही मोठे नुकसान झाले. याबाबत पेठ पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
गुजरात राष्ट्रीय महामार्गावर देवगाव फाटा नजिक पुलाजवळ पलटी झालेला ट्रक