दिंडोरी l वैभव पगार :- दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाने पुन्हा एकदा घवघवीत यश संपादन करत १२ वी परीक्षेत ९८% निकालाची नोंद केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेसाठी एकूण ८१७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या यशात वाणिज्य शाखेतील वैष्णवी निवृत्ती खांदवे हिने ५०७ गुण (८४.५०%) मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्यामागोमाग निकिता शरद कोरडे हिने ५०३ गुण (८३.८३%) घेऊन द्वितीय क्रमांक, तर ऋतुजा वैतुकू थेटे हिने ४९३ गुण (८२.१७%) मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. विज्ञान शाखेतून प्रांजल प्रशांत वडजे हिने ४८७ गुण (८१.१७%) सह चौथा क्रमांक मिळवला, तर नंदू गोतिराम बोरस्ते हिने ४८० गुण (८०%) मिळवत पाचवा क्रमांक मिळवला आहे.
या यशानंतर मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, संचालक प्रवीण नाना जाधव, सर्व पदाधिकारी, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. भास्कर ढोके, शालेय समित्यांचे अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, दत्तात्रय जाधव, दौलत दादा उखर्डे तसेच प्राचार्य प्रा. शरद शेजवळ, उपप्राचार्य उत्तम भरसठ, पर्यवेक्षक रावसाहेब उशीर व यशवंत दाणी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
प्राचार्य प्रा. शरद शेजवळ यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीसह शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेचे पाठबळ यामुळेच हे यश शक्य झाले आहे. आमचे शैक्षणिक कार्य पुढेही प्रेरणादायी राहील.