महाराष्ट्र ट्रायबल न्युज

किसान सभेचा दिंडोरीत मोर्चा, तहसिल कार्यालयाच्या आवारात शासनाच्या विरोधात घोषणाबाजी

दिंडोरी l मनोज पाटील
     शासनाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने माकपचे जिल्हा सचिव रमेश चौधरी, डी.वाय.एफ.आय तालुका अध्यक्ष आप्पा वाटणे, किसान सभा तालुकाध्यक्ष देविदास वाघ, जनवादी महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मीबाई काळे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील येथे मोर्चा काढण्यात आला, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मोर्चास प्रारंभ करत थेट तहसील कार्यालयात मोर्चा येताच शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले, यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते, पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता,


किसान सभेच्या मागण्या:
     वनाधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, 
तालुक्यातील सर्व एमआयडीसी व कारखान्यातील रोजगारात स्थानिक युवक, युवतींना 80% प्राधान्य द्यावे, 
 ऑनलाईन रेशन कार्ड करून लाभार्थ्यांना शिधा वाटप करा,
 वृद्धापकाळ, विधवा महिला पेन्शन चालू करण्यासाठी प्रलंबित प्रकरणे निकाली काढा, 
जनसुरक्षा विधेयक मागे घ्या, 
हेग्जोगोन न्यूट्रिशियन कंपनीच्या कामगारांना पूर्वत कामावर घ्या, 
 सफाई कामगारांना किमान वेतन लागू करा, 

चौकट-
वाहनाचा काही काळ चक्का जाम:

दिंडोरी पंचायत समिती च्या समोर मोर्चाच्या सुरुवातीस निळवंडीरोड वर वाहनाचा काही काळ चक्का जाम झाला होता, यावेळी शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करा अशी हुंकार मोर्चा वेळी देण्यात येत होती, नाशिक कळवण रास्त्यावर एकतास वाहतुकीची कोंडी झाली होती, यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या,  

विविध मागण्या बाबत किसान सभेच्या वतीने दिंडोरी तहसील येथे शासनाच्या विरोधात काढण्यात आलेला मोर्चा,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने