महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पिकअप कारवर उलटली, जिवितहानी टळली

दिंडोरी।  मनोज पाटील दि.8 
वणी - दिंडोरी - नाशिक महार्गावरील दिंडोरी शहरात गर्दीत वेगाने येणारी पिकअप वाहनचालकाचा ताबा सुटून पलटी होत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्विफ्ट कारवर जावून आदळली. कार मध्ये दोन महिला बसलेल्या होत्या मात्र त्या सुदैवाने बचावल्या .स्विफ्ट कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 पिकअप क्रमांक (एमएच 15 जेसी 7455) ही अवनखेड ता. दिंडोरी येथून सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पुदिना पूर्ण भरुन नाशिक कडे जात असतांना शहरातील बाजारपेठ असलेल्या गर्दीच्या ठिकाणी पिकअप चालकाचे नियंत्रण सुटून दिंडोरी शहरातील साईनाथ पाववडे दुकानासमोर उभ्या असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक (एमएच 15 एचजी 6334)पिकअप पलटी होत या वाहनावर जावून आदळली. त्यात एक महिलेला किरकोळ मार लागला दिंडोरी शहरात सायंकाळी वाहनाची गर्दी असतांना सुध्दा पिकअप चालक वाहन वेगाने चालवित होता. चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर पिकअप चालक फरार झाला.बघ्यांची मोठी गर्दी होत वाहतूकिची कोंडी झाली पोलिसांनी घटनास्थळी येत क्रेन मागवत गाडी दूर करत वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने