दिंडोरी । मनोज पाटील :- दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथे अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि. 31 मे ते रविवार दि. 8 जून 2025 रोजी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
या अखंड हरिनाम सप्ताह काळात पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 10 ते 12 गाथा भजन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 11 वाजता हरिकिर्तन आदी कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. 31 रोजी निवृत्ती महाराज नांदुर्डीकर (दिंडोरी), रविवार दि. 1 रोजी आण्णा महाराज चव्हाण (वनारवाडी), सोमवार दि. 2 रोजी नंदकिशोर महाराज पवार (आहेरगांव), मंगळवार दि. 3 रोजी ज्ञानेश्वर महाराज तुपे, बेलू (सिन्नर), बुधवार दि. 4 रोजी ज्ञानेश्वर महाराज नाठे (पाडे), गुरुवार दि. 5 रोजी एकनाथ महाराज चत्तर शास्त्री (पारनेर), शुक्रवार दि. 6 रोजी सुवर्णामाई जमधडे (येवला), शनिवार दि. 7 रोजी पांडूरंग महाराज उगले (परभणी), रविवार दि. 8 रोजी सकाळी 8 वाजता दिंडी मिरवणूक होणार आहे. त्याचदिवशी कांचनताई जगताप (सामनगांव) यांचे काल्याचे किर्तन सायंकाळी 4 ते 6 वाजता होणार आहे. त्यानंतर काल्याच्या किर्तनानंतर समस्त सोमवंशी परिवाराच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात येवून सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी या अखंड हरिनाम सप्ताहाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखंड हरिनाम सप्ताह समिती, महारुद्र भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ यांनी केले आहे.