महाराष्ट्र ट्रायबल न्युज

आदिवासी पँथर संघटनेचे सुरगाणा तहसीलदार यांना निवेदन

सुरगाणा l कृष्णा पवार:- आदिवासी विकास विभाग अंतर्गत १७९१ कंत्राटी शिक्षक भरती जीआर / निर्णय तात्काळ रद्द करावा, आदिवासी आश्रमशाळा मध्ये अत्यन्त कमी मानधनवर प्रामाणिक काम करत असलेल्या रोजनदारी कर्मचारी यांना विनाअट शासनसेवेत समायोजन करावे, अवकाळी पाऊसमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठयाप्रमाणात नुकसान झाले असून त्याना तात्काळ नुकसान भरपाई दयावी, पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत जाचक अटी रद्द करून वंचितांना घरकुल मिळावे, आदिवासी मुला - मुलींनकरिता उंबरठाण, पांगारणे येथे आदिवासी वसतिगृह उभारावे, पांगारणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम करावे, पळसन येथील बंद पडलेले उधोगिक प्रशिक्षण केंद्र (आय टी आय ) चे काम तात्काळ चालू करावे, सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य मिळावे, आदी विविध मागण्याचे निवेदन सुरगाणा तहसीलदार यांना आदिवासी पँथर संघटना च्या वतीने प्राध्यापक तुळशीराम खोटरे यांनी दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने