दिंडोरी । प्रतिनिधी:- परिचयाचा गैरफायदा घेऊन पैशांची गरज असल्याचे भासवून जादा परतावा देण्याचे आमीष दाखवत 46 लाख 90 हजार रुपयांना गंडा घालणार्या तिघांविरोधात दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, श्रीराम भगवान तांबे व त्यांची आई तांबे दोघे रा. निर्मला विहार, निळवंडी रोड, दिंडोरी, हल्ली मुक्काम आदिवासी भवनजवळ, रो हाऊस नंबर 6 दिंडोरी व काशिद रा. पिंपळगाव धूम, ता. दिंडोरी अशा तिघांची अक्षय मनसुख देशमुख (रा. दिंडोरी) यांचे कुटुंबियांबरोबर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर चांगल्या परीचयात झाले.ङ्गङ्गकाही कालावधी गेल्यानंतर नमूदङ्गङ्गतिघांनी देशमुख कुटुंबियांशी संपर्क वाढविला व पैशाची गरज आहे असे सांगितले व या बदल्यात अधिक रक्कम देऊ असे अमिष संगनमत करुन दाखविले. विश्वास संपादीत करुन अक्षय यांच्याकडून वेळोवेळी फोन पे व ऑनलाईन अॅपद्वारे 46 लाख 90 हजार रुपये घेतले. मात्र अधिक परतावा तर नाहीत मात्र घेतलेली मुद्दल रक्कमही देण्यास संबधित टाळाटाळ करत असल्याचे देशमुख यांचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत प्रथमवर्ग दिंडोरी न्यायालयात याविरोधात तक्रार दाखल केली. याबाबत न्यायालयाने याची दखल घेतली व गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिंडोरी पोलिसांना दिले. पोलिसांनी तांबे श्रीराम तांबे व काशिद अशा तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे