दिंडोरी l प्रतिनिधी:- परनॉड रिकार्ड इंडिया ,चाईल्ड सर्व्हाइव्हल इंडिया व ग्रामपंचायत राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर येथे मोफत त्वचारोग तपासणी शिबिर आणि रक्त तपासणी कॅम्पचे (एन.सी.डी)मोफत आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये एकूण 72 ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला .कॅम्प मध्ये एकूण 36 रूग्णांनी आपली रक्त तपासणी केली. यामध्ये 287 प्रकारच्या विविध तपासण्या करण्यात आल्या .तसेच एकूण 34 रूग्णांनी त्वचारोग शिबिरामध्ये तपासणी केली.
शिबीरामध्ये त्वचारोग वर पोषण आहारावर आधारित खेळाद्वारे माहिती देखील आली .
प्रमुख उपस्थिती म्हणून गावाचे सरपंच श्री रामकृष्ण गवारे, उपसरपंच श्री बाळासाहेब देशमुख, ग्रा. प. सदस्य श्री प्रताप देशमुख, धनंजय वानले प्राथ शिक्षक उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र राजापूरचे रेड्डी सिस्टर, आशा वर्कर शांता गोडे, व संगीता धटिंगण, एम पी डब्लू पालवी दादा ,तसेच अंगणवाडी सेविका कुंदा गांगुर्डे, सरुबाई सुर्यवंशी उपस्थित होते . शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष सहकार्य केले . शिबिरासाठी त्वचारोगतज्ञ डॉ. स्नेहल कुमार नवले , वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे फ्लेबोटोमिस्ट राहुल विधाते उपस्थित होते .
सदर कार्यक्रमाचे नियोजन चाईल्ड सर्व्हाइव्हल इंडिया संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक जितेन्द्र अहिरे,सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक विनोद आडोकर , मेडीकल ऑफिसर डॉ. सिद्धार्थ गांगुर्डे, फार्मसिस्ट ऋषिकेश गावडे , हेल्थ एज्युकेटर तुषार साबळे, निशा पवार व सोनाली शेळके आणि देविदास निकम उपस्थित होते.