maharashtratribalnews

ग्रामविकास अधिकारी रामदास गायखे यांचा सेवापुर्ती सोहळा

दिंडोरी । मनोज पाटील 
दिंडोरी तालुक्यातील करंजाळी येथील ग्रामविकास अधिकारी रामदास गायखे यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात पार पडला.
अध्यक्षस्थानी दिंडोरी पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते गोकूळ झिरवाळ उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी रामदास गायखे यांचा कराटे शिक्षक हनुमंत आहिरे, सरपंच चेतन माळेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गांयखे यांच्या जागेवर दत्तात्रय काठे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन कराटे शिक्षक हनुमंत आहिरे यांनी केले. यावेळी रामदास गायखे हे सेवानिवृत्त झाल्याने ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्र अनावर झाले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन देवपाड्याचे दिपक चौधरी यांनी केले तर आभार पोपट गायकवाड यांनी मानले. याप्रसंगी सरपंच चेतन माळेकर, उपसरपंच कल्पना दळवी, सदस्य हेमराज डंबाळे, यमुनाबाई गायकवाड, हनुमंत पवार, मंगला डंबाळे, हिरामण महाले, पोपट गायकवाड, पद्माबाई गावित, सुरेखा डंबाळे, आशा कार्यकर्ती सुरेखा डंबाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने